पेट्रोल - डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे धरणे   
 
वरोरा : डिझेलचे वाढते दर कमी करून सामान्य जनतेला दिलासा मिळण्याकरिता या दरवाढीविरोधात 
वरोरा येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर कमी असताना त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्याउलट मोठ्या प्रमाणात दरवाढ होऊन सामान्य जनतेच्या खीशाला कात्री लावण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. आता या अन्यायकारी निर्णया विरोधात रडायचं नाही लढायचं असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते वरोरा व भद्रावती येथे आयोजित पेट्रोल - डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे धरणे आंदोलनात बोलत होते.त्यानंतर वरोरा येथे उपविभागीय अधिकारी व भद्रावती येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, मिलिंद भोयर, मनोहर स्वामी, कृ. उ. बा. स. सभापती राजू चिकटे, कृ. उ. बा. स. उपसभापती देवानंद मोरे, असिफ राजा, छोटूभाऊ शेख, धोपटे, संजीवनी भोयर, अनिल झोटिंग, शिरोमणी स्वामी, रत्नाताई अहिरकर, विश्वास बदखल, भगतसिंग मालुसरे, सूरज गावंडे, प्रवीण बडूरकर, वासुदेव ठाकरे, भोजराज झाडे, चंदू दानव, प्रशांत काळे, प्रदीप गावंडे, संजय पोडे, संतोष आमटे, राकेश दोतावार, गोलय्या कोमय्या यांची उपस्थिती होती. केंद्रात मोदींची सरकार येण्याआधी गॅस सिलेंडरचे भाव ३०० होते. त्यावेळी मार्केटिंग करीत ह्या किमती सर्वात जास्त असल्याच्या गवगवा भाजप सरकारने केला होता. मात्र आता गॅस सिलेंडरचे भाव ९०० च्या घरात आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडलेलं आहे.  त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात  कच्च्या  तेलाचे दर कमी असताना त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्याउलट मोठ्या प्रमाणात दरवाढ होऊन सामान्य जनतेच्या खीशाला कात्री लावण्याचे काम मोदी सरकार करीत आहे.असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.