सुमित राठोड यांना अहिल्यादेवी होळकर आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

विदर्भ वतन / नागपूर : सुमित रमेश राठोड यांना जनमत प्रतिष्ठान जळगाव यांच्या कडुन दिला जाणारा २०२० चा ‘अहिल्यादेवी होळकर आदर्श पुरस्कार’ नुकताचं जाहीर झाला आहे. सुमीत राठोड यांचे मुळ गाव वाशिम जिल्ह्यातील माहुली हे आहे. ते राज्य राखीव पोलीस बल गट क्र ०४ नागपूर येथे सेवारत आहेत.
त्यांना वृक्ष लागवड करणे व त्याचे संगोपन करणे, रक्तदान, गरजूंना मदत करणे, आपल्या वाढदिवशी गरजू मुलांना साहीत्य वाटप करून वाढदिवस साजरा करणे, मित्रांच्या वाढदिवसाला शुभेच्छा म्हणुन पक्ष्यांसाठी पाणपोई लावून शुभेच्छा देणे तसेचं पावसाळ्यात पक्ष्यांसाठी कृत्रीम घर तयार करणे व उन्हाळात त्यांच्यासाठी पाणपोई व अन्नाची सोय करणे असा सुमित राठोड यांचा व्यासंग असुन ते थोर महापुरूषांच्या कार्याला सुध्दा जोपासत आलेले आहेत. त्यांनी जवळपास ३५ थोर महापुरूषांचे फोटो स्वता: तयार करुन त्याच्या गावातील विविध उपक्रम राबवणारा जय सेवालाल ग्रुपला भेट म्हणून दिले आहेत.
  सुमितला कवीता लेखनाचा देखील छंद आहे. त्याने या काळात कोरोणावर रचलेल्या ‘रक्षक’ या कवितेने औरंगाबाद येथील ‘शब्दगंध समुह प्रकाशन’ तर्फे आॅनलाईन काव्य वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. पोलिस दलात राहुन असे वेगळे छंद जोपासने ही दुर्मिळच बाब आहे. अहिल्याबाई होळकर आदर्श पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सुमित राठोड याने आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!