अकरावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीची आत्महत्या

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर

नागपूर – नागपूर तालुक्यातील दवलामेटी येथील सिद्धार्थ सोसायटी निवासी प्रिशा बाबा पाटील वय १७ हिने गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

प्राप्त माहितीनुसार मृतक प्रिशा पाटील ही केंद्रीय विद्यालय अंबाझरी डिफेस येथे इयत्ता ११ वी मध्ये शिकत असुन नेहमीप्रमाणे ती रविवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १.३० वाजता शिकवणी वर्गासाठी घरून बाहेर पडली व संध्याकाळी ५.३० वाजता घरी परत येऊन सरळ तिच्या खोलीमध्ये गेली त्यावेळी तिचे आजोबा हॉल मध्ये बसून होते तर आई घरगुती कामात व्यस्त होते.मृतकचे वडील घरी आले असता मुलीबद्दल विचारले तेव्हा ती तिच्या खोलीत असल्याची माहिती आईने दिली.

सायंकाळी ९.३०वाजताच्या सुमारास जेवणासाठी वारंवार आवाज दिला असता आतमधून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने आईने खिडकीतून डोकावून पाहीले असता मृतक प्रिशा ओढणीच्या साहयाने पंख्याला गळफास घेऊन लटकलेली दिसली.लगेच खोलीचा दरवाजा तोडून डॉक्टरकडे नेले असता तिला मृत घोषित केले.

मृतक प्रिशाने आत्महत्या करण्यापूर्वी तिने लिहलेली चिट्ठी मिळाली असून त्यात फक्त सॉरी एवढाच शब्द लिहीलेला हाेता.त्यामुळे आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजले नाही.पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!