अरविंद केजरीवालांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

  • तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे केजरीवाल दुसरी व्यक्ती

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर

वृत्तसंस्था – आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आज तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. असे करणारे ते तिसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. यापूर्वी काँग्रेसच्या शिला दीक्षित यांनी तीन वेळेस दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया आणि 6 आमदारांनी मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. सहा आमदारांमध्ये मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि राजेंद्र गौतम यांचा सहभाग आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडले तर एकाही नेत्याला शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले नाही.

या शपथविधी सोहळ्यासाठी रामलील मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली होती. याशिवाय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी सुरक्षासाठी पोलिसबल तैनात केले आहेत. दिल्ली पोलिस आणि पैरामिलिट्री दलाचे दोन ते तीन हजार जवान समारंभाठिकाणी तैनात केले असल्याचे सांगितले जात आहे.

शपथ घेतल्यानंतर केजरीवाल म्हणाले की, “आज तुमच्या मुलाने तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हा माझा नाही तर लोकांचा, दिल्लीवासियांचा, प्रत्येक आई-बहिणीचा विजय आहे. मागील पाच वर्षांत दिल्लीतील प्रत्येक परिवाराच्या आयुष्यात आनंद देण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न राहिला आहे. निवडणुकीत काही लोकांनी आप, भाजप आणि काँग्रेसला मतदान केले. परंतु मी सर्वांचा मुख्यमंत्री आहे. मी भाजप आणि काँग्रेसवाल्यांचा देखील सीएम आहे. मागील वर्षांत आम्ही कधीच कोणासोबत सावत्रपणाचा व्यवहार केला नाही.”

“दिल्लीतील दोन कोटी परिवारांना सांगू इच्छित आहे की, आता निवडणूक संपली आहे. सर्व दोन कोटी लोक माझ्या कुटुंबाचा भाग आहेत. संकोच न करता माझ्याकडे या, मी सर्वांचे काम करेन. मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असला तरीही. सर्वांसोबत मिळून काम करण्याची माझी इच्छा आहे. निवडणुकीत विरोधक जे काही म्हणाले त्याबाबत मी त्यांना माफ केले. आपण केंद्रासोबत मिळून काम करू. पंतप्रधानांना देखील शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले होते, बहुतेक ते कामात व्यस्त असतील, त्यामुळे ते येऊ शकेल नाहीत. दिल्लीला पुढे नेण्यासाठी मला पंतप्रधानांचा आशीर्वाद हवा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!