मराठा क्रांती ठोक मोर्चा, मंत्रालयावर धडक देणार – अध्यक्ष आबासाहेब पाटील

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर

वृत्तसंस्था – हिंगणघाट तालुक्यात फुलराणीला जिवंत जाळणाऱ्या नराधमास एक महिन्याच्या आत फासावर चढवावे तसेच महिला अत्याचाराविरोधात नवा कायदा अस्तित्वात आणावा यासाठी २७ फेब्रुवारी रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चा मंत्रालयावर धडक देणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

मराठा क्रांती ठोक माेर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दारोडा येथे फुलराणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आबासाहेब पाटील म्हणाले, हिंगणघाट शहरात तरुणीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळले त्याच बरोबर औरंगाबाद येथील महिलेला घरात जाऊन जिवंत जाळण्यात आले. या घटना ताज्या असूनही महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.सरकारने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. हिंगणघाट येथील फुलराणीच्या कुटुंबातील सदस्यांना २५ लाख रुपयांची तत्काळ मदत देण्यात यावी तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत रुजू करावे आणि या प्रकरणातील आरोपीला एक महिन्याच्या आत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!