शासनातर्फे राबविल्या जाणा-या योजनेतून शेतक-यांना मिळाली शेततळी

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर

नागपूर – राज्यातील पर्जन्यमानावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविण्यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना राज्यात राबविली. २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून सुरू झालेल्या या योजनेत जिल्ह्याने २०२९ शेततळे तयार केले आहे. त्यावर ९ कोटी ८२ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

२०१६-१७मध्ये जिल्ह्यात ८६८ शेततळे तयार करण्यात आले. यासाठी ४ कोटी १२ लक्ष रुपये खर्च करण्यात आले. २०१७-१७ मध्ये ५४१ शेततळे तयार करण्यात आलेत. त्यासाठी २ कोटी ६१ लाख रुपये खर्च करण्यात आले. २०१७-१८मध्ये ३७४ शेततळे तयार करण्यात आले. त्यावर १ कोटी ८७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. २०१९-२०मध्ये आतापर्यंत २४६ शेततळे तयार करण्यात आले आहे. त्यावर १ कोटी २१ लाख रुपये खर्च झाले आहेत. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ४५९ शेततळे रामटेक तालुक्यात तयार करण्यात आले आहेत. त्यावर २ कोटी २२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. मागेल त्याला शेततळे या योजनेतून झालेल्या जलसिंचनामुळे २०१९-२० या वर्षासाठी ३,५०० शेततळ्याचा लक्षांक ठेवण्यात आला आहे. त्यासाठी ५,७६७ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ३५९४ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!