कुणबी समाज संघटनेने काढला ‘कॅन्डल मार्च’

विदर्भ वतन न्यु पोर्टल, नागपूर

नागपूर : हिंगणघाट येथील तरुणीवर पेट्रोल टाकून तिची जाळून हत्या करण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज गुरुवारी सर्वशाखीय कुणबी समाज संघटनेने ‘कॅन्डल मार्च’ काढला. या प्रकरणातील आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, यासाठी सरकारने न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

महाल येथील अखिल कुणबी समाज भवनातून या मोर्चाला सुरुवात झाली.  झेंडा चौक, कल्याणेश्वर मंदिर, गांधी द्वार द्वार मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला. तेथे पीडित तरुणीला आदरांजली अर्पण करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!