विद्यार्थी घडवणे म्हणजे खरा देशविकास – आ. विनोद अग्रवाल

  • माध्यमिक शाळा चुलोद येथे स्नेह संमेलन संपन्न

     विदर्भ वतन न्युज पोर्टल, गोंदिया

      प्रतिनिधी / गोंदिया

फक्त इमारती, रोड, रस्ते बांधणे म्हणजे विकास नव्हे तर उद्याची पिढी घडविण्यासाठी विद्यार्थी घडवणे म्हणजे खरा विकास आहे. अभ्यासात समाजिक शिक्षण आणि समाजात वावरणारा उद्याचा युवा घडवणे आज काळाची गरज आहे. विद्यार्थ्यात संस्कार आणि चारित्र्यवान बनवण्याचे कार्य हे प्राथमिक शिक्षणातून होते. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी ही लाख मोलाची आहे असे विधान आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. ते पूर्व माध्यमिक शाळा चुलोद येथे स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार अग्रवाल यांनी उपस्थित विद्यार्थी आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे गणवेशासाठी 50 टक्के निधी म्हणजेच 2.5 कोटी रुपयांचा निधी हा शासनाकडून विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देल्याची माहिती यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली. तसेच जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचे नुकसानभरपाईचे चुकारे जेमतेम 45 दिवसात मिळवून दिल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. शिवाय धान उत्पादक शेतकऱ्यांना 700 रुपये बोनस सुद्धा शासनाकडून मिळवून दिल्याचेही ते बोलले. तसेच शैक्षणिक जीवनात व गाव पातळीवरील विकासासंबंधी कोणत्याही समस्या असल्यास सरळ मला संपर्क करा असे आव्हान सुद्धा त्यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत चूलोद चे सरपंच ललित बिसेन, उद्घाटक आमदार विनोद अग्रवाल दीप प्रज्वलन राधाकृष्ण ठाकूर प्रमुख अतिथी म्हणून देवेंद्र रहांगडाले, विनोद बानेवार, शिवकुमार उपवंशी, गोविंद ठाकूर, जनक काळसर्पे, बाबूलाल राऊत, प्रकाश बनकर, गणेश दमाहे, गोपालकृष्ण ठाकूर, अशोक येरपुडे, सानूभाऊ हरिणखेडे, गोविंद राऊत इत्यादी मंडळी मंचावर उपस्थित होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालू बिसेन, गोपाल चूटे, हंसराज चौरे, महेश बानेवार, मोहन बरईकर, राष्ट्रपाल वैद्य, राजेश बानेवार, महेश ढोमणे, प्रल्हाद राऊत व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!