शुक्रवारपासून चितेगाव येथे पहिले ग्रामगीता महोत्सव

विदर्भ वतन न्युज पोर्टल, चंद्रपूर

चंद्रपूर/ प्रतिनिधी 
वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांच्या ५१ व्या स्मृती वर्षाच्या निमित्त पहिला ग्रामगीता महोत्सव दिनांक १४ फेब्रुवारी (शुक्रवार) ते १६ फेब्रुवारी रोजी चितेगाव ता. मूल येथे आयोजित करण्यात आला आहे. 

शुक्रवारी उद्घाटन समारंभ होईल.

  • परिसंवाद १ – दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत 
विषय – आजची सामाजिक-राजकीय परिस्थिती आणि ग्रामगीता अध्यक्ष – सुप्रसिद्ध कवी तथा विचारवंत प्रा. ज्ञानेश वाकुडकर  वक्ते – अॅड. फरहात बेग, प्रस्तावना – ॲड. पारोमिताताई गोस्वामी, भूमिका – स्वागताध्यक्ष ॲड. कल्याणकुमार मांडतील.
  • सांय. ६.३० वाजता – सामुदायिक प्रार्थना व मार्गदर्शन – ग्रामगीताचार्य शरद सहारे करणार असून, नियोजन    नामदेव पिजदुरकर, विलास चौधरी, सुखदेव चौथाले, गणेश मांडवकर, मुल, खुशालजी मसराम करतील.
  • रात्रो ७.३० वाजता – खंजिरी भजन होईल.

दुस-या दिवशी दिनांक १५ फेब्रुवारी शनिवार

  • परिसंवाद – २ – सकाळी १० वा. विषय – आजची शैक्षणिक परिस्थिती आणि ग्रामगीता
अध्यक्ष – प्रा. डॉ. जयश्री कापसे, चंद्रपूर, वक्ते –  मा. प्रा.  अभिजित मेंढे, नागपूर, मा. प्रभू राजगडकर (सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी) मार्गदर्शन करतील.
  • तिसरे परिसंवाद दुपारी १ वाजता
विषय -आजची आरोग्य व्यवस्था आणि ग्रामगीता यावर अध्यक्ष – मा. शुभदा देशमुख (गडचिरोली) वक्ते – डॉ. नवलाजी  मुळे (अड्याळ टेकडी), रूपचंदजी दखणे, (घाटी) संबोधित करतील.
  • चौथे परिसंवाद सांयकाळी ३.३० वाजता  विषय -आजची वाढती बेरोजगारी आणि ग्रामगीता
अध्यक्ष – ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, वक्ते – मा. सुरेंद्र बुराडे,  नामदेव पिजदूरकर, सुखदेव चौथाले, विजय सिद्धावार मार्गदर्शन करतील.
  • सांयकाळी ६.३० – सामुदायिक प्रार्थना  व मार्गदर्शन – खुशालजी मसराम करतील.  नियोजन – नामदेव पिजदूरकर , सुखदेव चौथाले, गणेश मांडवकर करतील.
  • रात्रौ ७.३० वाजता इंजि. उदयपाल वनीकर सप्तखंजेरीवादक (सत्यपाल महाराज यांचे शिष्य) यांचा सप्तखंजिरी वादनाचा कार्यक्रम होईल. रात्री १० नंतर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि.  १६ फेब्रुवारी (रविवार) 
  • सकाळी ११ वाजतासमारोप आणि पारितोषिक वितरण /सत्कार समारंभ    होईल.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. पारोमिता गोस्वामी, प्रमुख वक्ते म्हणून डाॅ. विकास पाठक सुप्रसिद्ध पत्रकार तथा विचारवंत
         (चेन्नई) यांची उपस्थिती राहिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!