आयुध निर्माणी परिसरात बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदीने पुन्हा एकदा नागरिकांत आक्रोश व संभ्रमाची स्थिती

  • बँका,शाळा,गॅस एजन्सी,विवाह समारंभ कार्यासाठी येणारे नागरिक संकटात
  • सुरक्षेच्या कारणाने बंदी – आयुध निर्माणी प्रशासन 
  • खा. कृपाल तुमाने नी केली महाप्रबंधकांशी चर्चा 

        विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर

नागपूर- आयुध निर्माणी अंबाझरी परिसरातील कर्मचारी व त्यांच्या परिवारासाठी बाजार, गॅस एजन्सी, बँक, विवाह समारोहात येण्या जाण्याची सुविधा मागील ४० वर्षांपासून कुठल्याही प्रकारची अडचण येता नियमित पणे सुरू आहे. परंतु अचानक आयुध निर्माणी अंबाझरी प्रशासनाद्वारे सुरक्षेचे कारण पुढे करून अनधिकृत व्यक्तींसाठी प्रवेश बंदीने नागरिकात आक्रोश व संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले.

प्राप्त माहितीनुसार सुरक्षेचे कारण दाखवून आयुध निर्माणी प्रशासनाने सुरक्षा विभाग व त्यांचे कर्मचारी व कुटुंबीयांकडे अधिकृत पास धारकांना सोडून अन्य नागरिकास डिफेन्स परिसरात प्रवेश बंदीची कार्यवाही सुरू केली आहे. लक्षात असावे की मागील वर्षी प्रशासनाने अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता. परंतु मोठा विरोध लक्षात घेता त्या निर्णयाला स्थगित करावे लागले होते. शिवसेनेचे नागपूर तहसील प्रमुख संजय अनासने ने चर्चेत सांगितले की डिफेन्स परिसरात बाजार, शाळा, बँक असून डिफेन्स परिसरात बाहेरील नागरिकही ग्राहक सुविधा घेत आहेत. गॅसच्या २ एजन्सीचे वितरणासाठी दररोज ग्राहक मोठ्या संख्येने येथे येतात. २ सरकारी बँक असल्याने बाहेरील खातेदार सेवा प्राप्त करीत आहेत. २ समाज सदन गृह पारिवारिक संमेलनासाठी राखीव असून स्थानिक परिसरा च्या व्यतिरिक्त वाडी व नागपूरचे परिचित, नितेवाईकही येतात. अशात प्रशासनाने विकल्प व कुठलीही माहिती न देता अशा प्रकारची कार्यवाही अनुचित व अन्यायकारक दिसून येत आहे. रविवारला साप्ताहिक बाजाराच्या दिवशीही अचानक बंदीने मोठ्या संख्येत नागरिक दत्तवाडी प्रवेशद्वारासमोर एकत्र येऊन विरोध केला.
संजय अनासने ने सुरक्षा विभागाचे कर्नल सोबत या संदर्भात चर्चा केली परंतु सुरक्षेचे कारण देऊन त्यांनीही असमर्थता व्यक्त केली. यादरम्यान दत्तवाडीतील एका समारोहात उपस्थित खा. कृपाल तुमाने ला घटनेची सूचना मिळतात ते डिफेन्सच्या वरिष्ठ महाप्रबंधकासोबत फोनवर संपर्क करून ४० वर्षांपासून सुरू असलेली ही सुविधा अचानक बंदीने नागरिकांना होणाऱ्या असुविधेपासून त्यांना अवगत केले.चर्चेदरम्यान महाप्रबंधकांनी राज्य व केंद्र सरकार द्वारा प्राप्त सूचनेच्या अंतर्गत ही व्यवस्था लागू करण्यात येत असल्याचे सांगितले. अनुमान आहे की १५ फेब्रुवारी पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर ही कार्यवाही सुरू राहण्याची संभावना आहे. या संदर्भात वाडी पत्रकार संघानेही आयुध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही वरून आदेश असल्याने ही कार्यवाही सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली. परंतु बँक व्यवहार, गॅस वितरण, पारिवारिक समारोहात येणारे नागरिक-ग्राहक कसे जाणार या प्रश्नावर कोणतेही सुविधाजनक उत्तर देऊ शकले नाही. शिवसेना व त्रस्त नागरिकांनी सांगितले की ४-५ दिवस वाट पाहिल्यानंतर आयुध निर्माणी प्रशासनाने गॅस,बँक इत्यादी सुविधा वाडी परिसरात ग्राहकांच्या हितार्थ स्थानांतर करावे,सामान्य जनता बाजार परिसराच्या पुढे जात नाही म्हणून प्रशासनाने फॅक्टरीकडे जाणारा पोस्ट ऑफिस परिसरात सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी व डिफेन्स दत्तवाडी प्रवेशद्वारावर ओळखपत्र दाखवून आवश्यक कार्यासाठी जाणाऱ्यांसाठी अस्थायी प्रवेश पास देण्याची मागणीही त्यांनी केली.सुरक्षा विषयात राजनीती केली जाणार नाही व प्रशासन निश्चित उपाय करणार ज्यामुळे मध्यम मार्ग निघून सुरक्षा व्यवस्था निश्चित होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!