प्रतापगड यात्रेत आरोग्य प्रबोधिनी करणार, खर्रा-तंबाखू मुक्तिची जनजागृती

  • विधानसभाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांचे आरोग्य प्रबोधिनी च्या व्यसनमुक्ती कार्यास सहकार्य करण्याचे अधिकारयाना निर्देश

            विदर्भ वतन न्युज पोर्टल , गोंदिया

गोंदिया- व्यसनमुक्ती,आरोग्य शिक्षण व पारंपारिक वैदु सक्षमीकरण उपक्रमात अग्रेसर संस्था आरोग्य प्रबोधिनी वडसा व्दारा मोरगाव अर्जुनी तालुक्यातील प्रतापगडच्या महादेव यात्रेत व हारुन दरगाह उर्स भाविकांना तंबाखू मुक्त करणार आहेत. दरवर्षी १२-१५ लाख भाविक महाशिवरात्रीच्या पाच दिवसीय यात्रेत हजेरी लावतात. देवाकडे येतांनी चांगले तेच घ्यावे, वाईट व्यसनांचा त्याग करावा, यानुसार तंबाखू खर्रा याचे व्यसन सोडून व्यसन मुक्त जीवनाचा संकल्प करावा. यासाठी आरोग्य प्रबोधिनी पुढाकार घेणार आहे.
तंबाखू खर्रा याचे फार घातक परिणाम होतात. आज मोठ्या प्रमाणात कर्करोगाचा धोका वाढला आहे. त्याला कारणीभूत तंबाखूजन्य पदार्थ आहेत. त्यामुळे युवकांनी, महिलांनी व शाळकरी विद्यार्थ्यांनी त॓बाखूमुक्त असावे.

यात्रेदरम्यान तंबाखूमुक्ति च्या उपक्रमास सर्वानी सहकार्य करावे असे निर्देश नानाभाऊ पटोले यांनी प्रतापगड यात्रेसंबधीच्या आढावा बैठकीत व्यक्त केले. यासोबतच आकर्षक घोषवाक्ये, भाविकांना आकर्षित करु शकणारे व व्यसनमुक्तीचा संदेश देणारे क्रुती उपक्रम करण्याचे निर्देश विधानसभाध्यक्षांनी सर्वांना दिले.यावेळी तंबाखूविरोधी घोषफलकाचे अनावरण नानाभाऊच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्य प्रबोधिनीचे मुख्य प्रवर्तक डाॅ. सूर्यप्रकाश गभने यांनी क्रुती उपक्रमाचे सादरीकरण केले.सरप॓च अहिल्याबाई वालदे,उपसरप॓च तेजराम राऊत व आरती पुराम यांनी सहाय्य केले.

1 thought on “प्रतापगड यात्रेत आरोग्य प्रबोधिनी करणार, खर्रा-तंबाखू मुक्तिची जनजागृती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!